HSC Result 2025 Maharashtra Board: प्रतीक्षा संपली, उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल, येथून करा चेक

HSC Result 2025 Maharashtra Board

मित्रांनो तुम्ही देखील 12वी ची परीक्षा दिली आहे का? आणि HSC Result 2025 Maharashtra Board च्या निकालाची वाट पाहत आहेत का? तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण उद्या म्हणजेच सोमवारी 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता 12वी चा निकल (HSC Result 2025) जाहीर होणार आहे.

MSBSHSE HSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इ. १२ वी परीक्षेचा निकाल ०५ मे, 2025 रोजी दुपारी 01:00 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवर पाहता येतील. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय आहे. तसेच, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत संधी उपलब्ध आहेत. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

Maharashtra Board 12th result date

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इ. 12 वीच्या परीक्षेचा निकाल 05 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करणार आहे. विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर (website) निकाल पाहू शकतील. तसेच, Digilocker ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका (marksheet) उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे. पुढे तुम्हाला तुमचा निकाल पाहण्यासाठी वेबसाइट दिल्या आहेत. त्यावरून तुम्ही तुमचा (HSC Result 2025 Maharashtra Board) निकाल चेक करू शकता.

HSC Result 2025 Check Online

HSC Result 2025 Maharashtra Board
HSC Result 2025 Maharashtra Board

निकाल पाहण्यासाठी महत्वाच्या लिंक :

1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. http://hscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org

मित्रांनो या 4 मधील कोणत्याही वेबसाइट वरुण तुम्ही तुमचा निकाल पाहू शकणार आहेत. त्यामुळे ही माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा. ज्यांनी या वर्षी 12वी ची परीक्षा दीलेली आहे. आणि आपला ग्रुप नक्की जॉइन करा. म्हणजे निकाल लागला की तुम्हाला कळवण्यात येईल.

ही अपडेट पहा :

error: Content is protected !!